माहिम केळवा धरणाला गळती, आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्याने जवळील गावांना सतर्कतेचा इशारा ...
पालघर: दि. ८, पालघर तालुक्यातील माहीम - केळवा धरणं मधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरु झाली आहे. हे धरण झांजरोली गावाच्या वरील बाजूस असल्याने धरणाच्या खालील गावांना जिल्हा प्रशासनाकडून धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. माहीम केळवे धरणाच्या गळती ही गंभीर बाब असून, यामुळे आपत्कालीन परिस्थिती निमार्ण झाली आहे. धरणाच्या सुरक्षितेसंदर्भात, चोवीस तास निगराणी ठेवून, आवश्यक त्या सर्व उपाययोजना व काळजी क्षेत्रीय कार्यालयामार्फत घेण्यात यावी असे आदेश कार्यकारी अभियंता, पालघर पाटबंधारे विभाग यांनी दिले आहेत.
तर लगतच्या गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होण्याचा सल्ला जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
माहिम केळवा ल.पा. योजनेवरील धरण गळतीची पाहणी श्री. मुरकुटे, कार्यकारी अभियंता, धरण सुरक्षा विभाग क्र. १. नाशिक यांनी दि. ०३/ ०१/२०२१ रोजी केलेली होती. त्यानुसार त्यानी धरणाच्या बाहेरील बाजुस धरणाच्या मुख्य विमोचकाच्या भिंतीच्या शिर्ष बाजुस (मुख्य भिंतीवर ) गळती तसेच धरणाच्या बाहेरील बाजुस (D/S) सा. क्र. १७५ ते १८० मी (Dam Body) मधून पावसाळ्यात सतत गळती बाबत तसेच कालव्याच्या मुख्य विमोचकाच्या भिंतीच्या शिर्षबाजुस ( मुख्य भिंत ) गळती सुरु असलेबाबत छायाचित्रांसह कळविले होते.
या पाहणी दरम्यान त्यांनी १) धरण पाणीसाठा हळू हळू (Gradually) कमी करण्यात यावा. २) सदर धरणाच्या विमोचक विहिरीस लागून असलेल्या Conduit चे अगोदर चित्रफीत (Video) तयार करावा, जेणेकरुन गळती होत असलेल्या भागाचा अंदाज येईल. ३) धरणाच्या विमोचक विहिरीस लागून असलेल्या Conduit च्या मुखाजवळ पाणबुड्यांच्या सहाय्याने ताडपत्री (Tarpaulin) लावून बंद करावे व सदर ताडपत्री सुटू नये याकरीता sand bag ठेवण्यात याव्या. ४) धरणाच्या मुख्य विमोचकाच्या उजव्या बाजुस होत असलेल्या गळतीचा विसर्ग नियमित नोंदविण्यात यावा. ५) धरणाच्या D/S बाजुस मुख्य विमोचकाच्या वर असलेले गवत व झाडे झुडपे TBL पर्यंत काढण्यात यावे. ६) धरणाचे D/S बाजुस सा. क्र. १७५ ते १८० मी. वरील गवत व झाडे झुडपे TBL पर्यंतचे काढण्यात यावे. याच बरोबर कार्यकारी अभियंता, धरण सुरक्षा विभाग क्र. १. नाशिक यांनी क्षेत्रीय स्तरावर केलेल्या
निरीक्षणाच्या अनुषंगाने उपाययोजना त्वरीत करण्याचे निर्देशित केले होते. तसेच उपरोक्त
BOX ZEN धरणाचा पाणीसाठा कमी करण्याच्या अनुषंगाने Head Regulator मधून पाण्याचा विसर्ग वाढवून पाणीसाठा
कमी करण्याच्या कार्यस्थळी सुचना दिल्याचे सांगितले आहे.
Comments
Post a Comment