जि.प.सदस्य मिताली बागुल यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन

 

जि.प.सदस्य मिताली बागूल यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन


वाडा/जयेश घोडविंदे:वाडा तालुक्यातील खरीवली गावात नुतन वर्षी पालघर जिल्हा परिषद सदस्य मिताली बागुल यांच्या वाढ दिवसाचे निमित्ताने गावातील साई मंदिर परिसरात विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

    वाढदिवस आला की अनेक राजकीय व्यक्ती कार्यकर्त्यांना पार्टी देऊन अवाढव्य  खर्च करत असतात परंतु ह्या बाबी टाळून मिताली बागुल यांनी आपल्या वाढदिवसा निमित्ताने सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करून समाजासमोर नवीन पायंडा घालून दिला आहे.

      सदर या कार्यक्रमात गरजू व्यक्तींना ब्लँकेट वाटप,लहान मुलांना खाऊ,टी शर्ट, महिलांना साडी व अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. तसेच गावातील नागरिकाचे आरोग्य उत्तम रहावे यासाठी मोफत नेत्र तपासणी तसेच पूर्ण शरीराची मशीनद्वारे आरोग्य तपासणी ,ईसीजी ,मधुमेह ब्लड प्रेशर यांची तपासणी करण्यात आली तसेच मोफत औषधेही उपलब्ध करून उपलब्ध करून देण्यात आली होती.

     या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईमधील दानशूर व्यक्तिमत्व निलेश भाई शहा, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील, वाडा तालुका पंचायत समिती उपसभापती अमोल पाटील, जिल्हा परिषद सदस्य राजेश मुकणे, अरुण ठाकरे ठाकरे, पंचायत समिती सदस्य राजेश सातवी, सागर ठाकरे, विक्रमगड विधानसभा संपर्कप्रमुख गोविंद पाटील ,धनंजय पष्टे, शिवसेना वाडा तालुका युवा अधिकारी निलेश पाटील, भावेश पाटील दीपक मोकाशी धनंजय ठाकरे विशाल गावले,जनसेवा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नरेश जाधव, भूषण ठाकरे, वैभव भोईर ज्येष्ठ समाजसेवक कमलाकर पाटील आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

Comments